Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
दिवाळीची खरेदी करुन घरी जाताना टेम्पोंची धडक, भाऊ-बहिणीसह पुतणी ठारकेआयटीमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजराशाहूवाडीत बिबटयाचा हल्ला, वृद्ध दाम्पत्यांचा मृत्यूसेंट्रल रेल्वेच्या विभागीय प्रवासी सल्लागार समिती सदस्यपदी आनंद मानेउद्योन्मुख खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी ब्रँड कोल्हापूरने निधी उभारावा-यशवंतराव थोरातगोकुळच्या व्यासपीठावरून काँग्रेसच्या आमदारांची मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये महायुती सरकारवर टीकास्त्र, हा विषय न समजण्यासारखाथेट पाईपलाईनचे श्रेय घेता मग जबाबदारी का झटकता ? राजेश क्षीरसागरांचा सतेज पाटलांना पलटवारआता चौथी-सातवीच्या वर्गासाठी शिष्यवृत्ती परीक्षा ! एकवेळची बाब म्हणून फेब्रुवारीत पाचवी-आठवीची परीक्षा !शिवाजी विद्यापीठ आंतरविभागीय महिला बास्केटाबॉलल स्पर्धेत तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी मुलींच्या संघास विजेतेपदसावित्रीबाई फुले रुग्णालयातील अतिदक्षता विभाग नऊ दिवस बंद

जाहिरात

 

…तरच चंदेरी दुनियेत या ! अभिनेता संकर्षण कऱ्हाडेनी साधला तरुणाईशी संवाद

schedule12 Oct 25 person by visibility 294 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘तुमच्यात धमक असेल, इच्छाशक्ती असेल आणि एखादं कौशल्य असेल, तर चंदेरी दुनियेत अवश्य या,” असे मत अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी दिला. ते केआयटी अभियांत्रिकी (स्वायत्त प्रदत्त) महाविद्यालयात येथे आयोजित ‘अभिग्यान पूर्वरंग सोहळा २०२५’ या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

या कार्यक्रमात येत्या ९ नोव्हेंबर २०२५ रोजी होणाऱ्या ‘अभिग्यान’ महोत्सवाच्या १३ व्या पर्वासाठी ४ मान्यवर पाहुण्यांची घोषणा करण्यात आली. यावर्षीच्या अभिग्यान कार्यक्रमासाठी ‘क्विक हिल’ चे संजय काटकर,सामाजिक कार्यकर्ते डॉ.अभय बंग, प्रसिद्ध अभिनेत्री रेणुका शहाणे आणि एआयतज्ञ चिन्मय गव्हाणकर हे पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. दरम्यान अभिनेता संकर्षण कऱ्हाडे यांची प्रा.प्रमोद पाटील यांनी मुलाखत घेतली. या संवादात त्यांनी आपल्या आयुष्याचा प्रवास, कलाक्षेत्रातील अनुभव, तसेच तरुणाईसाठी ऊर्जा आणि प्रेरणादायी विचार मांडले. त्यांच्या स्पष्टवक्तेपणाने आणि विनोदी शैलीने रंगलेल्या या मुलाखतीत ‘रॅपिड फायर राउंड’ ने कार्यक्रमाला अधिक रंगत आणली. केआयटीचे उपाध्यक्ष उद्योजक सचिन मेनन  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

सचिन मेनन यांनी या अभिग्यान या उपक्रमाच्या अंतर्गत विद्यार्थ्यापर्यंत आधुनिक तंत्रज्ञान,सामाजिक,उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या  सकारात्मक व्यक्तींची ओळख व त्यांचे विचार पोहोचवले जातात अशा प्रकारच्या आशयाचे मनोगत व्यक्त केले. संस्थेचे संचालक डॉ.मोहन वनरोट्टी आणि माजी विद्यार्थी व उद्योजक चेतन नरके उपस्थित होते. शिवेंद्र देसाई यांनी प्रास्ताविक केले. संयम पाटील आणि अंकिता गिड्डे यांनी सूत्रसंचालन केले. आदित्य साळुंखे आणि समीक्षा बुधले यांनीआभार मानले. अभिग्यान समन्वयक प्रा.अमर टिकोळे  यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. अभिग्यान सह-समन्वयक प्रा.प्रसाद जाधव यांनी ९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अभिग्यान २०२५ मधील पाहुण्यांची ओळख करून दिली.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes