Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
इच्छुकांची स्थायीसाठी तयारी, माधुरी किरण नकातेनी घेतली आमदारांची भेट कॉलेजने केले अर्थसहाय्य, राष्ट्रीय स्पर्धेत विद्यार्थ्याकडून केआयटीचा डंकाघोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय हिंदी प्रतिभा सन्मान डॉ. राजेश ख्यालप्पा यांना एफआयसीपी फेलोशिपसचिन पाटलांच्या उमेदवारीला मिळतेय मतदारांची पसंती, तरुण नेतृत्वात विकासकामाची धडाडीहाऊसफुल्ल गर्दीत दालनचा समारोप ! १०० फ्लॅट, ५० प्लॉटसाठी बुकिंग! लिफ्ट पार्किंगची नोंदणी !!मेरी वेदर मैदानावर तेरा फेब्रुवारीपासून भीमा कृषी प्रदर्शनमहापौर-उपमहापौरपदाचे उमेदवार ठरले !  सभागृहात महायुतीच्या विरोधात काँग्रेस लढणार! !काँग्रेस लढणार महापौर- उपमहापौरपदाची निवडणूक ! सचिन शेंडे, दुर्वास कदम उमेदवार !!शिक्षणाचा कोल्हापूर मनपा पॅटर्न राज्यात भारी ! शिष्यवृत्तीची रक्कम पाच हजार करणारी एकमेव महापालिक!!

जाहिरात

 

नूतन मराठीचा विद्यार्थी गौरव पाटीलला राष्ट्रीय शालेय कुस्तीमध्ये सुवर्णपदक

schedule08 Dec 25 person by visibility 436 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर  :  येथील प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटीच्या नूतन मराठी विद्यालय हायस्कूलचा विद्यार्थी पैलवान गौरव पाटीलने राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे झालेल्या राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेत गौरव पाटील याने ८० किलो ग्रीकोरोमन प्रकारामध्ये महाराष्ट्रासाठी सुवर्णपदकाची कमाई केली. उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब आणि बिहारच्या बलाढ्य मल्लांवर अचूक डावपेच, दमदार ताकद आणि निश्चयाच्या बळावर सलग विजय मिळवून गौरवने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.  शाळेचे मुख्याध्यापक धनंजय बेदरे, क्रीडा विभाग प्रमुख विनय शिंदे, जिमखाना प्रमुख रश्मी भागवत यांचे त्याला मार्गदर्शन लाभले.  सेना केसरी पैलवान गुंडाजी पाटील कुस्ती केंद्र कोपार्डेचा गौरव हा पैलवान आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes