राजारामपुरीतून रॅली, कार्यकर्त्यांच्या घोषणा अन् जल्लोषी स्वागत ! विजय जाधव यांचा कार्यालय प्रवेश !!
schedule02 Jun 25 person by visibility 87 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : भारतीय जनता पक्ष कोल्हापूर महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांचा कार्यालय प्रवेश जल्लोषात झाला. नागाळा पार्क येथील भाजप कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार केला. जाधव यांची महानगर जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड झाली आहे. राजारामपुरी येथून रॅलीद्वारे जाधव कार्यालयात आल. कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
खासदार धनंजय महाडिक, प्रदेश सचिव महेश जाधव, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सदस्य राहुल चिकोडे यांनी पुष्पहार घालून नूतन जिल्हाध्यक्षांचे स्वागत केले. प्रदेश सचिव महेश जाधव म्हणाले 30 वर्षापासून कार्यरत असणाऱ्या विजय जाधव यांच्या फेरनिवडीने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. सर्व कार्यकर्त्यांनी, नूतन जिल्हाध्यक् जाधव यांच्या खांद्याला खांदा लावून काम करावे. भाजपाची सत्ता महानगरपालिकेत यावी यासाठी विशेष परिश्रम घ्यावेत.’
याप्रसंगी गायत्री राऊत, डॉ. राजवर्धन, अशोक देसाई, हेमंत आराध्ये, गणेश देसाई, संतोष भिवटे, राजसिंह शेळके, अमर साठे, उमा इंगळे, माधुरी नकाते, किरण नकाते, धनश्री तोडकर, संगीता खाडे, मंगला निपाणीकर, रोहित पवार, अतुल चव्हाण, गिरीश साळुंखे, रुपाराणी निकम, आजम जमादार, संतोष माळी, अनिल कामत, भरत काळे, शैलेश पाटील, विजय अग्रवाल, रोहित कारंडे, प्रज्ञेश हमलाई, सुमित पारखे, अप्पा लाड, अभय तेंडुलकर, वैभव कुंभार, प्रीतम यादव, सुनील पाटील, धीरज पाटील, विशाल शिराळकर, सचिन पवार यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
………………..
“ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण यांनी जी जबाबदारी माझ्यावर सोपवलेली आहे. ती जबाबदारी समर्थपणे मी येणाऱ्या तीन वर्षांमध्ये पेलून भारतीय जनता पार्टीचा विचार शेवटच्या घटकापर्यंत नेण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहीन.”
- विजय जाधव, कोल्हापूर महानगर जिल्हाध्यक्ष भाजपा