Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जोतिबा मंदिर विकास आराखडा अंमलबजावणीसाठी सरकार पाठीशी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसग्रंथपाल - शारीरिक शिक्षण संचालकपदाच्या भरतीसाठी प्राचार्य असोसिशनने घेतली मंत्र्यांची भेटबीबीए, बीसीएसाठी पुन्हा प्रवेश परीक्षा होणार- मंत्री चंद्रकांत पाटील यांची अधिकाऱ्यांना सूचनाशिक्षकांचा प्रशिक्षणामधील अनुपस्थितीचा कालावधी क्षमापित करावा : भरत रसाळेगोकुळच्या राजकारणात महादेवराव महाडिकांची एंन्ट्री, निवडणुकीसाठी ठोकला शड्डू ! सत्ताधारी नेतृत्वावर डागली तोफ !गोकुळचे  चेअरमन-संचालकांनी घेतली अजित पवारांची भेट, दुग्ध व्यवसायसंबंधी चर्चा !!जेईई अॅडव्हान्स परीक्षेत विवेकानंद  कॉलेजचे यश महापालिका निवडणुकीसाठी भाजपा मैदानात, ८१ प्रभागात नागरिकांसाटी शिबिरेभालकर्स कला अकादमीचे पुरस्कार जाहीर ! अनिल वेल्हाळ, सतीश रणदिवे, दिलीप बापट, प्रवीण कोडोलीकरांचा समावेश !!केआयटीतर्फे अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेसंबंधी रविवारी मार्गदर्शन कार्यक्रम

जाहिरात

 

वडगावमध्ये उभारणार १०० खाटांचे हॉस्पिटल ! खासदार-आमदारांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक !!

schedule04 Jun 25 person by visibility 93 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : वडगावमध्ये १००० खाटांचे सुसज्ज असे ‘लोकनेते बळवंतराव यादव हॉस्पिटल’ उभे राहण्यासाठी प्रशस्त जागा मागणीचा प्रस्ताव लवकरात लवकर सादर करावा. हॉस्पिटलच्या उभारणीसाठी लागणारा निधी उपलब्ध होण्यासाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याशी चर्चा करण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.

  लोकनेते बळवंतराव यादव हॉस्पिटलचे नूतनीकरण होऊन १०० खाटांचे सुसज्ज हॉस्पिटल होण्याबाबत खासदार धैर्यशील माने व आमदार अशोकराव माने यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहू सभागृहात बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, इचलकरंजी महानगरपालिकेचे उपायुक्त नंदू परळकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.  सरिता थोरात, इचलकरंजीच्या सहाय्यक कामगार आयुक्त जानकी भोईटे, राज्य कामगार विमा सोसायटीचे वैद्यकीय प्रशासन अधिकारी डॉ. मिलिंद चौधरी, वैद्यकीय अधिकारी जयश्री जावडेकर तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

     खासदार धैर्यशील माने म्हणाले, वडगाव परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी उपजिल्हा रुग्णालय स्वरुपात लोकनेते बळवंतराव यादव हॉस्पिटल सुसज्ज स्वरुपात उभे करावे. यासाठी या हॉस्पिटलचे नूतनीकरण होण्याऐवजी हे हॉस्पिटल प्रशस्त जागेत नव्याने उभे राहावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आमदार अशोकराव माने म्हणाले, वडगाव भागातील नागरिकांची लोकसंख्या वाढत असून या भागातील नागरिकांना चांगल्या दर्जाच्या आरोग्य आरोग्य सुविधा देण्यासाठी लोकनेते बळवंतराव यादव हॉस्पिटल मोठ्या जागेमध्ये प्रशस्त स्वरुपात उभारणे आवश्यक आहे. हे हॉस्पिटल लवकरात लवकर सुरु होण्यासाठी जलद कार्यवाही व्हावी, असेही त्यांनी सांगितले.

 

 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes