Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
वडगावमध्ये उभारणार १०० खाटांचे हॉस्पिटल ! खासदार-आमदारांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक !! शिक्षक त्रस्त, दुसऱ्या दिवशीही सर्व्हर डाऊन ! प्रशिक्षण नावापुरतेच, प्रशिक्षणाची वेळही गैरसोयीची !!देशभरातील टॉप टेन संशोधकात शिवाजी विद्यापीठाचे प्रकुलगुरू प्रमोद पाटील !चित्रपट महामंडळातर्फे कलामहर्षी बाबुराव पेंटर जयंती साजरीसुवर्णा सावंत यांनी स्वीकारला माध्यमिक शिक्षणाधिकारीपदाचा कार्यभार रंगबहारतर्फे कलामहर्षी बाबुराव पेंटर यांना अभिवादन महापालिकेच्या सिटी इंजिनीअरपदी हर्षजीत घाटगे, जल अभियंतापदी रमेश मस्करवाढीव टप्पासाठी पाच जूनपासून कोल्हापूर-गारगोटी पायी दिंडीवरिष्ठ निवड श्रेणी प्रशिक्षणास सुरुवात, पहिल्याच दिवशी सर्व्हर डाऊनची समस्याकिसान काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी सागर कोंडेकर

जाहिरात

 

नेर्लीत सतेज - ऋतु बैलगाडी शर्यतीचा थरार, सरपंच राजा-आरएक्स बैज्या बैलजोडीने जिंकले मैदान

schedule02 Jun 25 person by visibility 101 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :  हुर्र.... म्हणताच वाऱ्याच्या वेगाने धावणारी बैल... एकापेक्षा एक सहभागी झालेल्या बैलजोड्या... शर्यत जिंकण्यासाठीची चढाओढ अन् मैदानी खेळाचा थरार पाहण्यासाठी शौकिनांची उपस्थिती हे चित्र होते, करवीर तालुक्यातील नेर्ली येथील. निमित्त होतं, माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित बैलगाडी शर्यतीचे.

कोल्हापूर दक्षिण शर्यत शौकीनच्यावतीने नेर्ली येथे, पश्चिम महाराष्ट्रातील सतेज -ऋतू बैलगाडी स्पर्धा, आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेचा उद्घाटन विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते झाले. या बैलगाडी शर्यतीत सर्जा, राजा, बुलट छब्या, सांगोला राज्या अशी अनेक बैल जोड्या सहभागी झाल्या होत्या. बैलं मालकांनी हुर्र.... म्हणताच वाऱ्याच्या वेगाने धावणारी बैल अशा वातावरणात  बैलगाडी शर्यती पार पडल्या. या बैलगाडी शर्यतीमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील बैलगाडी शर्यत प्रेमींनी हजेरी लावली होती. पाचगाव येथील संभाजी गाडगीळ यांच्या आरएक्स बैज्या आणि युवराज शिंदे यांच्या सरपंच राजा बैलजोडी सतेज - ऋतु बैलगाडी शर्यत स्पर्धेची मानकरी ठरली.

या बैलजोडीने या स्पर्धेचा प्रथम क्रमांक पटकावत एक लाख रुपयांचे बक्षीस जिंकले. तर महेश बोंद्रे यांच्या बुलेट छब्या आणि शिवाजी मेटकरी यांच्या सांगोला राजा बैलजोडी द्वितीय तर पाटील डेअरी यांच्या फुल्या आणि अमोल घागरे यांच्या कॅडबरी ही बैल जोडी तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली. याप्रसंगी गोकुळचे संचालक प्रकाश पाटील, शशिकांत पाटील चुयेकर, बाबासो चौगले, बयाजी शेळके, बाजार समिती संचालक सुयोग वाडकर, उचगावचे सरपंच मधुकर चव्हाण, गोकुळ शिरगाव सरपंच चंद्रकांत डावरे, सांगवडेवाडी सरपंच सुदर्शन खोत, कणेरी सरपंच निशांत पाटील, पाचगावचे माजी सरपंच संग्राम पाटील, माजी सरपंच शशिकांत खवरे, नेर्ली उपसरपंच निखिल पाटील बिद्री कारखान्याचे संचालक आर एस कांबळे, नारायण गाडगिळ, सागर पाटील, गजानन पाटील उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes