Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
रामसिना ग्रुपकडून द सिटी सेंटर प्रीमियम व्यावसायिक प्रकल्पाचे भूमिपूजन जनहित याचिकेचा प्रभाव : बाल हक्क संरक्षण आयोग अधिक सक्षम, पदसंख्येत मोठी वाढपुस्तक : मानवी भावना, ज्ञान आणि संस्कृतीच्या संवादाचे प्रभावी माध्यमकोल्हापुरात पांढरे जांभूळ, आंब्याच्या विविध १८ जाती ! मिलेटचे १० विविध प्रकार !! युवाशक्ती जागर यात्रेत कृष्णराज महाडिकांचे तडाखेबाज भाषण,  मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईतून यात्रेला प्रारंभतत्कालिन सहायक निबंधक सुजय कदम यांची चौकशी होणार, अपर निबंधकांनी दिले आदेशमिलेट रांगोळीतून साकारली शाहू महाराजांची प्रतिमाशैक्षणिक संस्थांमध्ये समुपदेशक नेमण्याची उपजिल्हाधिकाऱ्यांकडे मागणीकौन्सिल ऑफ एज्युकेशनतर्फे शोकसभा,  डॉ. श्रीकृष्ण महाजन यांना श्रद्धांजलीखाजगी शिक्षक सेवक पतसंस्थेतर्फे शिष्यवृत्ती सराव परीक्षा, 1800 विद्यार्थ्यांचा सहभाग

जाहिरात

 

कोल्हापुरात पांढरे जांभूळ, आंब्याच्या विविध १८ जाती ! मिलेटचे १० विविध प्रकार !!

schedule22 Apr 26 person by visibility 70 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : पांढरे जांभूळ, आंब्याच्या विविध १८ जाती, ३५० ग्रॅमहून अधिक वजनाचा आंबा, विविध प्रकारची तृणधान्ये…हे सारे एकाच छताखाली कोल्हापुरात उपलब्ध झाले आहे. निमित्त आहे, फळ व मिलेट महोत्सवाचे.

उत्पादक ते ग्राहक थेट विक्री योजनेंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले मिलेट्स त्याचे पदार्थ, तसेच विविध फळांची विक्री होण्याच्या उद्देशाने कृषी पणन मंडळामार्फत भारत हाऊसिंग सोसायटी हॉल, राजारामपुरी या ठिकाणी २२ ते २६ एप्रिल या कालावधीमध्ये महोत्सवाचे आयोजन केले आहे. बुधवारी, सायंकाळी या महोत्सवाचे उद्घाटन विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे, जिल्हा कृषी अधिकारी जालिंदर पांगारे, पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले, हिंदकेसरी दीनानाथ सिंह, शेतकरी संघाचे संचालक दत्ताजीराव वारके, बबनराव रानगे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी पणन मंडळाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या "पौष्टिक तृणधान्य पाककृती" पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. खानापूर येथील प्रगतशील शेतकरी विजय मोरे यांनी आंब्याच्या विविध जाती विकसित केल्याबद्दल त्यांचा आणि प्रसिद्ध रांगोळीकार शिवाजी जेऊरकर यांचा पुष्पगुच्छ देऊन प्रमुख अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मास्तोळी म्हणले, ‘या महोत्सवामुळे शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्यास मदत होईल. पणन मंडळाने अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर अथवा तत्पूर्वी कोल्हापूर शहरात आंबा महोत्सवाचे आयोजन करावे, जेणेकरून आंबा उत्पादकांना मोठ्या प्रमाणावर व्यासपीठ उपलब्ध होईल. या फळ मिलेट महोत्सवाचा लाभ जिल्हावासीयांनी घ्यावा.’ डॉ. सुभाष घुले यांनी प्रास्ताविकात या महोत्सवाचा उद्देश सांगितला.

त्या पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवामध्ये राज्यातील विविध प्रकारच्या मिलेटचे उत्पादन घेणारे शेतकरी तसेच आंबा, डाळिंब, स्ट्रॉबेरी, अंजीर, पेरू आदी फळे ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. या महोत्सवाची वेळ सकाळी ते रात्री अशी आहे. या प्रदर्शनात मिलेट फळांचे तब्बल ४५ विविध स्टॉल आहेत. मानवी आरोग्याच्या दृष्टीने २३ तारखेपासून 'मिलेटचे महत्त्व' यावर डॉ. संदीप पाटील, डॉ. अहिल्या वाघमोडे, डॉ. योगेश बन डॉ. प्रतिभा ठोंबरे . आहारतज्ज्ञांची व्याख्याने आयोजित केली आहेत. सुयोग टकले यांनी आभार मानले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes