युवा सेनेच्यावतीने राजेश क्षीरसागरांचा सत्कार
schedule10 Jul 25 person by visibility 70 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : शिवसेना कोल्हापूर युवा सेनेच्यावतीने महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर व पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या माजी कोषाध्यक्ष वैशाली शिरसागर यांचा सत्कार करण्यात आला. गुरु पौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात आला. राजकीय, सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असताना प्रत्येक युवा कार्यकर्त्याला समाजासाठी लढण्याची प्रेरणा आणि योग्य दिशा देण्याचं काम नेहमीच आमदार राजेश क्षीरसागर व वैशाली क्षीरसागर यांच्याकडून होत असते अशा भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. या कार्यक्रमासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.