Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
अनिल मेहता, अरुणा ढेरे यांना पुरस्कार ! प्रसाद प्रकाशनतर्फे पुण्यात वितरण समारंभ !!अलमट्टी धरणाच्या  उंची वाढीला महाराष्ट्राचा पूर्ण विरोध, धनंजय महाडिकांनी घेतली केंद्रीय जलशक्तीमंत्र्यांची भेटकोल्हापूरच्या एसपींची बदली ! योगेश कुमार गुप्ता नवे पोलिस अधीक्षक !!जुन्या पेन्शनसाठी पडताळणीसह प्रस्ताव मागवून घ्या - भरत रसाळेप्लास्टिकचा राक्षस विद्यार्थ्यांनी केला  बाटलीत  बंद ! अलमट्टीसंदर्भात पंधरा दिवसात पुन्हा सर्वपक्षीय बैठक-जलसंपदामंत्री  राधाकृष्ण विखे पाटीलराष्ट्रीय क्लासिक पॉवर लिफ्टिंग स्पर्धेला प्रारंभजिल्हा काँग्रेस कमिटीत राजीव गांधींना अभिवादनशिवसेना ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांचे अनोखे आंदोलन, मैदानावरील पाण्यात उधळल्या प्रतिकात्मक नोटाअॅथलेटिक्स असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षपदी शहाजी सुर्यवंशी, उपाध्यक्षपदी हेमचंद्र सरनाईक

जाहिरात

 

ऑलिम्पिक पदक विजेत्या स्वप्निल कुसाळेला अर्जुन पुरस्कार ! कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा !!

schedule02 Jan 25 person by visibility 617 categoryक्रीडासामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताला नेमबाजी क्रीडा प्रकारात कांस्यपदक जिंकून देणाऱ्या कोल्हापूरच्या स्वप्िनल सुरेश कुसाळे याला अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. भारत सरकारने गुरुवारी (दोन जानेवारी) राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा केली. यामध्ये खेळरत्न पुरस्कार चार खेळाडूंना, अर्जुन अॅवॉर्ड यंदा ३२ खेळाडूंना जाहीर झाला. विशेष म्हणजे स्वप्निल कुसाळेच्या प्रशिक्षिका दिपाली देशपांडे यांना द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर झाला आहे. १७ जानेवारी २०२५ रोजी पुरस्कार वितरण आहे. अर्जुन पुरस्कार विजेत्या खेळाडूला बक्षीस स्वरुपात पंधरा लाख रुपये मिळतात.  

स्वप्निल हा कोल्हापूर जिल्ह्यातील कांबळवाडी येथील आहेत. वडील शिक्षक आहेत. तर आई गृहिणी आहे. मध्यमवर्गीय कुटुंबांतील या तरुणाने ऑलिम्पिकपर्यंत झेप मारत पदकांची कमाई केली होती. स्वप्निल कुसाळेच्या रुपाने महाराष्ट्राला खाशाबा जाधव यांच्यानंतर दुसरं ऑलिम्पिक पदक मिळाले आहे. स्वप्निल हा सध्या रेल्वेत नोकरीला आहे. स्वप्निल कुसाळे हा मूळ कोल्हापूरचा असून तो रेल्वे कर्मचारी देखील आहे. स्वप्निल कुसाळेच्या रूपाने महाराष्ट्राला खाशाबा जाधवांनंतर दुसरं ऑलिम्पिक पदक मिळाले.

...................................

.खेलरत्न पुरस्कार चौघांना

क्रीडा क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा खेलरत्न पुरस्कार यंदा भारत सरकारकडून यंदा चार खेळाडूंनाजाहीर झाला. यामध्ये नेमबाजपटू मनू भाकर, बुद्धिबळपटू डी गुकेश, भारतीय हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंह हॉकी व प्रवीणकुमार पॅरा ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट यांचा समावेश आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीमध्ये मनू भाकरने दोन कांस्यपदक जिंकली आहेत. दहा मीटर एअर पिस्तुल आणि २५ मीटर एअर पिस्तुलमध्ये तिने पदक जिंकले आहे. विशेष म्हणजे एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी ती पहिली भारतीय आहे. खेलरत्न पुरस्कार प्राप्त खेळाडूंना २५ लाख रुपये बक्षीस, मानचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes