काँग्रेसकडून मुलाखती ! माजी महापौर-नगरसेवकासह पदाधिकारी, कार्यकर्ते इच्छुक ! !
schedule16 Dec 25 person by visibility 97 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून इच्छुकांच्या मुलाखती सुरू झाल्या. पहिल्या दिवशी एक ते दहा प्रभागातील इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. काँग्रेस कमिटी येथे या मुलाखती घेण्यात येत आहेत. बुधवारी, अकरा ते वीस प्रभागातील इच्छुकांच्या मुलाखती होणार आहेत. मुलाखतीसाठी प्रत्येक प्रभागातील इच्छुकांची संख्या जास्त आहे. जवळपास ३६० हून अधिक इच्छुकांनी उमेदवारी मागितली आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील हे मुलाखती घेत आहेत. यावेळी आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार ऋतुराज पाटील, शहराध्यक्ष सचिन चव्हाण, राजेश लाटकर, राज्य सचिव सुर्यकांत पाटील- बुद्धिहळकर, आनंद माने, सरला पाटील, भारती पोवार, तौफीक मुल्लानी, विक्रम जाराग, प्रविण केसरकर, भरत रसाळे, वेदावती मोहिते, वैशाली महाडिक यांची उपस्थित होती. मुलाखती दरम्यान इच्छुकांनी, सामाजिक कार्य, पक्षप्रती निष्ठा, जनसंपर्क, संघटनात्मक काम आणि स्थानिक समस्यांवरील भूमिकेबद्दल चर्चा केली. मंगळवारी, माजी नगरसेवक सुभाष बुचडे, संदीप नेजदार, स्वाती यवलुजे, अजित पोवार धामोडकर, माणिक पाटील, माधुरी लाड, मोहन सालपे, कैलास गौडदाब, धनंजय सावंत, प्रकाश पाटील, मायादेवी भंडारे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मंगळवारी मुलाखती दिल्या.