Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
उउ ततमेरी वेदर क्रिकेट क्लबतर्फे पंचगंगा स्मशानभूमीला शेणीदान कोल्हापूरच्या आयटी पार्कचा निर्णय अंतिम टप्प्यात, अमल महाडिकानी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट भाऊ पाध्ये हे मानवतावादी, अनुभववादी लेखक - समीक्षक प्रा. अविनाश सप्रे कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्याघघ ततकोल्हापुरात निवासी फुटबॉल क्रीडा प्रबोधिनी सुरु करण्यास तत्वत: मान्यता - राजेश क्षीरसागरांचा पाठपुरावा, क्रीडामंत्र्यांचे विधीमंडळात उत्तर !!शिवसेना इच्छुक उमेदवारांच्या प्रशिक्षण कार्यशाळेला जोरदार प्रतिसादमहापालिका निवडणुकीच्या जागा वाटपासाठी काँग्रेसची समिती, चार दिवस मित्रपक्षांशी चर्चासातारा-कागल महामार्गाच्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करा : खासदार धनंजय महाडिक

जाहिरात

 

जुन्या पेन्शनसाठी एकत्रित लढा, कोल्हापुरातील राज्यस्तरीय पेन्शन मेळाव्यात निर्धार

schedule08 Jun 25 person by visibility 369 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : जुन्या पेन्शनसाठी न्यायालयीन लढा सुरू असून तो जिंकण्यासाठी एकजुटीने लढा देण्याचा निर्धार राज्यस्तरीय पेन्शन मेळाव्यात घेण्यात आला. रविवारी, (८ जून २०२५) कोल्हापूरात झालेल्या या पेन्शन मेळाव्यास मुंबई, पुणे, नागपूर, नगर, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर येथून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार जयंत आसगावकर यांनी, ‘जुन्या पेन्शनसाठी सर्वांनी एकत्र येऊन हा लढा तीव्र करण्याची गरज आहे. पावसाळी अधिवेशनात हा प्रश्न पुन्हा उपस्थित केला जाईल,’ अशी ग्वाही दिली.
     ‘सभागृहात तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी जुनी पेन्शन देण्याची घोषणा केली, मात्र त्याची अद्यापही अंमलबजावणी झालेली नाही. सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन देण्याचा अध्यादेश निघाला, पण शिक्षकांना पेन्शन देण्यास सरकारची उदासीन भूमिका दिसत आहे. अधिकारी लोक जाणून-बुजून पेन्शनच्या बजेटचा आकडा वाढविला. परिणामी समितीचा अहवाल गुंडळून ठेवण्यात आलाशिक्षकांना नेमणुकीच्या दिनांकांपासून ग्रॅज्युटी मिळावी, यासाठी शासनाकडे पाठपुरावा आहे. ’असेही आसगावकर यांनी सांगितले.

पेन्शनबाबत मूळ याचिकाकर्ते शप्रदीप महल्ले म्हणाले, सरकारने जुन्या पेन्शनसाठी जी धोरणे आखलेली आहेत, त्या भोवतीच आपण फिरत चाललो आहे. यामुळे गेल्या तेरा वर्षापासून जुन्या पेन्शनचा प्रश्न खितपत पडला आहे. दोन्ही सभागृहात 26 हजार कर्मचाऱ्यांना पेन्शन देण्याचा निर्णय होऊन देखील त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होऊ शकली नाही. हा सभागृहाचा हक्कभंग होऊ शकतो. आपल्या एकजुटीमुळेच जुन्या पेन्शनचा विषय मार्गी लागणार आहे, असा विश्वास प्रदीप महल्ले यांनी व्यक्त केला. बाबासाहेब पाटील यांनी पेन्शन लढ्याचा आढावा घेतला.  यावेळी सुनील भोर, संजय वाळे, बी. जी. बोराडे, भरत रसाळे, राहुल पवार, जयसिंग पवार, आण्णासाहेब गायकवाड, सचिन नलवडे, संदेश राऊत, मिलिंद पांगिरेकर, सुरेश संकपाळ आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes