Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
उउ ततमेरी वेदर क्रिकेट क्लबतर्फे पंचगंगा स्मशानभूमीला शेणीदान कोल्हापूरच्या आयटी पार्कचा निर्णय अंतिम टप्प्यात, अमल महाडिकानी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट भाऊ पाध्ये हे मानवतावादी, अनुभववादी लेखक - समीक्षक प्रा. अविनाश सप्रे कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्याघघ ततकोल्हापुरात निवासी फुटबॉल क्रीडा प्रबोधिनी सुरु करण्यास तत्वत: मान्यता - राजेश क्षीरसागरांचा पाठपुरावा, क्रीडामंत्र्यांचे विधीमंडळात उत्तर !!शिवसेना इच्छुक उमेदवारांच्या प्रशिक्षण कार्यशाळेला जोरदार प्रतिसादमहापालिका निवडणुकीच्या जागा वाटपासाठी काँग्रेसची समिती, चार दिवस मित्रपक्षांशी चर्चासातारा-कागल महामार्गाच्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करा : खासदार धनंजय महाडिक

जाहिरात

 

भाजपच्या कोल्हापूर पश्चिमधील १८ मंडल अध्यक्षांच्या निवडी –जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील

schedule24 Apr 25 person by visibility 481 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : भारतीय जनता पार्टीच्या कोल्हापूर जिल्ह्यातील पश्चिम भागातील १८ मंडल अध्यक्षांची निवड जाहीर केल्या आहेत. या निवडी संघटनात्मक लोकशाही पद्धतीने केल्याची  माहिती भारतीय जनता पक्षाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळ, मंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, कोल्हापूर जिल्ह्याच्या सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार सुरेश  हळवणकर, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, आमदार शिवाजीराव पाटील आदींच्या मार्गदर्शनाखाली या मंडलाध्यक्षांच्या नेमणुका झाल्या आहेत. भविष्यकाळात भाजप प्रत्येक गावागावात घर चलो अभियान राबवून केंद्राच्या आणि राज्य सरकारच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचवेल असा विश्वास यावेळी नाथाजी पाटील यांनी व्यक्त केला.

मंडल अध्यक्षांची नावे पुढीलप्रमाणे :  नूल - अरुण मोकाशी, नेसरी - विजय गणपती पाटील, चंदगड - विशाल बल्लाळ, माणगाव - दिग्विजय देसाई, राधानगरी पूर्व -  संतोष कातिवले, राधानगरी पश्चिम - स्वप्नील लहुजी  जरग,  भुदरगड पूर्व - नामदेव साताप्पा चौगुले, भुदरगड पश्चिम -  संतोष विश्वास पाटील, कागल - एकनाथ पाटील, मुरगुड - ॲड अमर गणेश पाटील, गडहिंग्लज - प्रीतम महादेव कापसे, गगनबावडा - स्वप्नील पांडुरंग शिंदे, पन्हाळा पश्चिम - मंदार मारोतराव परितकर , शिये - विकास पाटील, सांगरूळ - सरदार सावंत, परिते - सतीश पाटील, पाचगाव  - सचिन मारुती पाटील, मुडशिंगी - प्रमोद निवृत्ती पाटील.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes