Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
केएमटीचे १५६ कर्मचारी सेवेत कायम, राजेश क्षीरसागरांचा पाठपुरावा ! कर्मचाऱ्यांचा शिवालयावर जल्लोष ! !राष्ट्रवादी शरद पवार पक्षातर्फे उमेदवारी मागणी अर्जास प्रारंभकोल्हापुरात शुक्रवारी एमएसएमई कॅपॅसिटी बिल्डिंग समिट २०२५-२६जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ, महापालिका निवडणूक महायुती एकत्रच लढणार ! धनंजय महाडिककोल्हापूर-इचलकरंजी महापालिकेसाठी 15 जानेवारीला मतदान ! 16 जानेवरीला मतमोजणी ! !चिकोडे ग्रंथालयात 860 रक्तदात्यांनी केले रक्तदान महापालिका निवडणुकीची आज घोषणा, निवडणूक आयोगाची दुपारी पत्रकार परिषद समाजातील कर्तबगारांची आदर्शवत कामगिरी नव्या पिढीसाठी प्रेरणादायी- निवेदिता मानेचित्रकार भाऊसो पाटील यांच्या निसर्गचित्रांचे प्रदर्शनशिवसेना ठाकरे पक्षाचा ३३ जागांचा प्रस्ताव, काँग्रेस समितीसोबत प्राथमिक चर्चा

जाहिरात

 

पाणी पुरवठा संस्थांच्या ट्रान्सफार्मरची चोरी, पोलिसांकडून तपासात दुर्लक्ष !  इरिगेशन फेडरेशनचे सोमवारी आंदोलन !!

schedule05 Dec 25 person by visibility 151 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : गेल्या काही महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारी पाणी पुरवठा संस्थांच्या इलेक्ट्रीक मोटर पंप, वायर, ट्रॉन्सफॉर्मर मधील साहित्य तसेच कृषिपंपाचे इतर साहित्य चोरीस जाण्याचे प्रमाण वाढलेले आहे. पंधरा गावातील पाणी पुरवठा संस्थेचे ट्रान्सफार्मरसह अन्य साहित्य चोरीला गेले. यासंबंधी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस प्रमुखांचीं भेट घेऊन इरिगशन फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी, चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली. मात्र पोलिस प्रशासनाकडून या तपास कामात दुर्लक्ष होत आहे. प्रशासनाचे या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी  सोमवारी, आठ डिसेंबर २०२५ रोजी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे इरिगेशन फेडरेशनचे नेते व माजी आमदार संजय घाटगे, फेडरेशनचे संपर्क प्रमुख विक्रांत पाटील, राजेंद्र सुर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पाणी पुरवठा संस्थेच्या ट्रान्सफार्मर व कॉपर चोरीला गेल्यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसत आहे. पोलिसांनी या प्रकाराचा तपास करावा. दोनवडे, बुबनाळ, तळसंदे, वडकशिवाले, खुपिरे, मौजे वडगाव, भुयेवाडी, व्हनाळी, नागाव, माले, वाडीचरण येथील पाणी पुरवठा संस्थेचे ट्रान्सफार्मर चोरीला गेले आहेत. या चोरी प्रकारात रॅकेटचा सहभाग् असून संगनमताने होत असल्याचा आमचा संशय आहे. पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन शोध घ्यावा अशी मागणी इरिगेशन फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी केली. तसेच नदीकाठावरील कृषीपंपांना सोलर प्रकल्प सक्तीचा करू नये. नदीकाठावर सोलर प्रकल्पाची उभारणी संयुक्तिक नाही. पूर व महापुरामुळे नदीकाठावर सोलर बसविणे अडचणीचे आहे. कृषीपंपाला फिडरवरुन सर्व्हिस कनेक्शन देण्याचे थांबवून सोलर कनेक्शन घेण्यासाठी सक्ती केली जात आहे.हे योग्य नाही असे पदाधिकारी म्हणाले. पत्रकार परिषदेवेळी चंद्रकांत पाटील - पाडळीकर, सचिन जमदाडे, महादेव सुतार सचिव मारुती पाटील आदी उपस्थिती होते.
…………………..

पोलिसांनी इच्छाशक्ती दाखवावी - संजय घाटगे

माजी आमदार संजय घाटगे यांनी याविषयी अतिशय पोटतिडकीने भूमिका मांडली. ‘सहकारी पाणी पुरवठा संस्थांच्या ट्रान्सफार्मर, कॉपर चोरीला जाण्याच्या प्रकारात गेल्या काही महिन्यात वाढ झाली आहे. पोलिस प्रशासनाला सांगूनही चोरांचा बंदोबस्त होत नाही. प्रशासनाचा चोर, गुन्हेगारांवर वचक असायला पाहिजे. शेतकऱ्यांशी निगडीत प्रश्न मांडूनही प्रशासनाकडून कठोर उपाययोजना होत नाहीत. तक्रार द्यायला गेल्यावर शेतकऱ्यांना योग्य वागणूक मिळत नाही. काही पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चुकीच्या वर्तणुकीमुळे हे प्रशासन म्हणजे गुन्हेगारांकडून पैसे काढून घेण्याचे केंद्र बनले आहे का अशी शंका येते.’ अशा शब्दांत माजी आमदार घाटगे यांनी संताप व्यक्त केल्या. हणम्याने यावं अन् कोणालाही टिकली मारुन जावी असा प्रकार सुरू आहे अशा शब्दांत त्यांनी प्रशासनाच्या कामकाजावर कोरडे ओढले. व्हनाळी येथे आमदार घाटगे यांच्या सहकारी पाणी पुरवठा संस्थेच्या ट्रान्सफार्मर दोन वेळा चोरीला गेल्या. त्या ठिकाणी नांदेडचा उल्लेख असलेल्या पाण्याच्या बाटल्या सापडल्या. पोलिसांना कळविले, पण कारवाई काही झाली नाही असे ते म्हणाले.  

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes