Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
केएमटीचे १५६ कर्मचारी सेवेत कायम, राजेश क्षीरसागरांचा पाठपुरावा ! कर्मचाऱ्यांचा शिवालयावर जल्लोष ! !राष्ट्रवादी शरद पवार पक्षातर्फे उमेदवारी मागणी अर्जास प्रारंभकोल्हापुरात शुक्रवारी एमएसएमई कॅपॅसिटी बिल्डिंग समिट २०२५-२६जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ, महापालिका निवडणूक महायुती एकत्रच लढणार ! धनंजय महाडिककोल्हापूर-इचलकरंजी महापालिकेसाठी 15 जानेवारीला मतदान ! 16 जानेवरीला मतमोजणी ! !चिकोडे ग्रंथालयात 860 रक्तदात्यांनी केले रक्तदान महापालिका निवडणुकीची आज घोषणा, निवडणूक आयोगाची दुपारी पत्रकार परिषद समाजातील कर्तबगारांची आदर्शवत कामगिरी नव्या पिढीसाठी प्रेरणादायी- निवेदिता मानेचित्रकार भाऊसो पाटील यांच्या निसर्गचित्रांचे प्रदर्शनशिवसेना ठाकरे पक्षाचा ३३ जागांचा प्रस्ताव, काँग्रेस समितीसोबत प्राथमिक चर्चा

जाहिरात

 

एकच मिशन -सक्तीची टीईटी रद्द ! शाळा बंद - शिक्षक रस्त्यावर, मोर्चाने कलेक्टर ऑफिसवर धडक !!

schedule05 Dec 25 person by visibility 2307 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अनिवार्य करण्याच्या निर्णयाविरोधात शुक्रवारी संपूर्ण राज्यभरातून आवाज उठला. ‘ रद्द करा-रद्द करा, सक्तीची टीईटी रद्द करा, अन्यायकारी संच मान्यतेचा आदेश मागे घ्या, जुनी पेन्शन योजना लागू करा, शिक्षण सेवकांना नियमित शिक्षकाचा दर्जा द्या’ या मागण्यासाठी समस्त  शिक्षक वर्ग रस्त्यावर उतरला. कोल्हापुरात हजारो शिक्षकांनी आंदोलनात सहभाग घेत मोर्चाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. ‘हा लढा वेतनासाठी नव्हे, शाळा आणि शिक्षण वाचविण्यासाठी आहे’अशी हाक दिली. शिवाय शाळा बंद ठेवत शिक्षक एकजुटीची ताकत दाखविली. राज्य सरकारने तत्काळ सुप्रीम कोर्टात टीईटी सक्तीच्या विरोधात पुनर्विचार याचिका दाखल करावी, अन्यथा शिक्षकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा मोर्चाद्वारे दिला. हमारी युनियन हमारी ताकत, लडके लेंगे हमारा हक्क अशा घोषणा देत मोर्चाचा मार्ग दणाणून सोडला.
 शिक्षण विभागाने, शाळा बंद आंदोलनात सहभागी झाला तर एक दिवसाचे वेतन कपात करु असा आदेश काढला होता. मात्र त्या आदेशाला न जुमानता शिक्षक हजारोच्या संख्येने मोर्चात सहभागी झाले. दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय हा मार्गावर शिक्षकांची गर्दी उसळली होती. दुपारी सव्वा बारा  वाजण्याच्या सुमारास मोर्चाला सुरुवात झाली. कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ, मुख्याध्यापक संघ, प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटना, संस्थाचालक असे सगळे घटक या आंदोलनात उतरले होते. शिक्षक आमदार जयंत आसगावकर, शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस. डी. लाड, दादासाहेब लाड, भरत रसाळे, खंडेराव जगदाळे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राहुल पोवार, आर. वाय. पाटील, बाबा पाटील आदींच्या नेतृत्वाखाली मोर्चाला सुरुवात झाली.
 दरम्यान मोर्चात सहभागी शिक्षकांच्या हातातील फलक लक्षवेधी होते. त्यावर ‘टीईटी सक्तीची निर्णय रद्द करा, शिक्षक सेवकांना नियमित शिक्षकाचा दर्जा द्या, जुनी पेन्शन योजना लागू करा,’असा मजकूर होता. दसरा चौक, व्हिनस कॉर्नर, बसंत बहार रोड ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा निघाला. जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चा पोहोचल्यानंतर त्याचे सभेत रूपांतर झाले यावेळी शिक्षक नेत्यांची भाषणे झाली दरम्यान स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, शिक्षक नेते प्रभाकर आरडे, क्रांती साखर कारखान्याचे चेअरमन शरद लाड, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक  विजयसिंह माने, भैय्या माने , विवेकानंद संस्थेचे कोल्हापूर विभागाचे प्रमुख श्रीराम साळुंखे यांनी आंदोलनात सहभागीत पाठिंबा दिला. मोर्चाच्या अग्रभागी महिला शिक्षक होत्या. कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचा फलक त्यांच्या हाती होता. उर्मिला शेंडगे,  संगीता पाटील, सरिता गुरव, लता जठार, नीलम नांगरे, सुजाता पाटील, राणे संकपाळ, वैशाली माने, वर्षा केनवडे आधी सामील होत्या 
 आंदोलनात सर्व शिक्षक संघटनांचा सहभाग हे ठळक वैशिष्ठ होते. पुरोगामी शिक्षक संघटनेचे प्रसाद पाटील, बी.जी. बोराडे,  प्राचार्य दत्तात्रय घुगरे, जयसिंग पवार, आर. डी. पाटील, एस व्ही सूर्यवंशी,  मुख्याध्यापक संघाचे सचिव आर वाय पाटील, मिलिंद पांगिरेकर, एस. के. पाटील, डी बी पाटील कुडित्रेकर, बी. बी पाटील,  एम आर पाटील, संजय सौंदलगे, शिवाजी गोंधळी, राजेश वरक, रविंद्र मोरे,  बी एस मडिवाळ,  उदय पाटील, विष्णू पाटील, सयाजी पाटील,  संदीप पाथरे, खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाचे राजेंद्र कोरे कोजिमाशीचे दीपक पाटील, सचिन शिंदे, अनिल चव्हाण, शरद तावदारे, सुभाष खामकर, राजेंद्र पाटील, सचिन पाटील, काकासो भोकरे, श्रीकांत पाटील, शिक्षक संघ माजी आमदार शिवाजीराव पाटील गटाचे संभाजी बापट, बबन केकरे, बाळासाहेब कांबळे प्रशांत पोतदार डी.पी पाटील, मारुती दिंडे,  श्वेता खांडेकर,  सर्जेराव सुतार, संदीप पाडळकर अनिता निगवे,  अनिता शिणगारे, शिक्षक संघ थोरात गटाचे विलास चौगले, रवी पाटील, सुनील पाटील, बाळासाहेब निंबाळकर, सुनील एडके, तानाजी मेढे, प्राथमिक शिक्षक समितीचे प्रमोद तौंदकर, प्रमोद भांगरे,  विकास पाटील, प्रकाश पाटील,  पुरोगामी शिक्षक संघटनेचे सुनील पवार, एस के पाटील, सर्जेराव ढेरे, श्रीकांत टिपुगडे, शिक्षक बँकेचे संचालक अमर वरुटे, शिक्षक सेनेचे संतोष आयरे, शिक्षक भारतीचे गजानन कांबळे, संजय जितकर,  महापालिका शाळा शिक्षक संघटनांचे  सुधाकर सावंत, विलास पिंगळे, दिलीप माने, विजय सुतार, साताप्पा पाटील, संभाजी चौगुले, शिवाजी गुरव, संदीप सुतार, जयश्री कांबळे, वैशाली पाटील, अनुराधा शिंदे, प्रियांका साजणे, राहुल बागडे, अमित पोटकुले, उमेश देसाई,  संजय कडगावे आदींचा सहभाग होता.  शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन दिले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes