जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नानासाहेब गाट यांचे निधन
schedule29 Nov 25 person by visibility 133 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व हुपरी येथील ज्येष्ठ नेते नानासाहेब फक्कड गाट यांचे शनिवारी (२९ नोव्हेंबर २०२५) निधन झाले. मृत्यूसमयी ते ८० वर्षाचे होते. गेले काही दिवस त्यांची प्रकृती ठीक नव्हती. त्यांच्या निधनाने सामाजिक, सहकार, राजकारणातील एक जाणते व्यक्तिमत्व हरपले अशा भावना व्यक्त् होत आहेत. हुपरीच्या पाणी योजनेचे शिल्पकार म्हणून त्यांना ओळखले जाई. जिल्हा परिषदेत तीन वेळा निवडून येण्याची हॅट्रटिक केली होती. त्यांनी १९९७, २००२ व २००७ मधील निवडणुकीत विजय मिळवला होता. हुपरीतील विविध संस्थेशी त्यांचा निकटचा संबंध होता. ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांनी काम केले होते. पंचमुखी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष होते. तसेच पैसाफंड शेतीमाल सहकारी संस्थेचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे. शिक्षण संस्थेशी निगडीत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, नातंवडे असा परिवार आहे.