छडा लावा- छडा लावा, ट्रान्सफॉर्मर चोरांचा छडा लावा : पाणीपुरवठा संस्थांचे आंदोलन
schedule08 Dec 25 person by visibility 183 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : सहकारी पाणीपुरवठा संस्थेच्या ट्रान्सफॉर्मर चोरीच्या विरोधात इरिगेशन फेडरेशनच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. सोमवारी सकाळी 11 वाजता झालेल्या या आंदोलनात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले. " छडा लावा छडा लावा, ट्रान्सफार्मर चोरांचा छडा लावा" अशा घोषणा देत त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. जवळपास पाच तास ठिय्या आंदोलन केल्यानंतर फेडरेशनच्या शिष्टमंडळांने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन दिले.
गेल्या काही महिन्यात सहकारी पाणीपुरवठा संस्थांच्या ट्रांसफार्मर व इतर साहित्य चोरीला जाण्याचे प्रमाण वाढलेले आहे. यामुळे सहकारी पाणीपुरवठा संस्थांना लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसत आहे. सहकारी तत्त्वावरील पाणीपुरवठा संस्था या शेतकऱ्याची निगडित आहेत. ट्रान्सफॉर्मर चोरांचा छडा लावा व कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी इरिगेशन फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे व जिल्हा पोलीस प्रमुख योगेशकुमार गुप्ता यांच्याकडे केली होती. प्रशासनाचे लक्ष वेधूनही ट्रान्सफार्मर चोरी करणाऱ्यांचा छडा लागला नाही, गतीने तपास झाला नाही या निषेधार्थ सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन पुकारले होते असे माजी आमदार संजय घाटगे यांनी सांगितलेआंदोलनात इरिगेन फेडरेशनचे, विक्रांत पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबासाहेब देवकर, गोकुळचे संचालक अंबरिश घाटगे, संदीप पाटील कुर्डूकर. चंद्रकांत पाटील, सचिन जमदाडे, सखाराम चव्हाण, संजय चौगुले, रणजीत पाटील, सुभाष पाटील, ज्ञानदेव पाटील, बाहुबली पाटील, सुभाष शहापुरे, इंद्रजीत पाटील, मारुती पाटील याच्यासह शेतकऱ्यांचा सहभाग मोठ्या संख्येने होता.
विक्रातं पाटील यांनी ट्रांसफार्मर चोरीमुळे सहकारी पाणीपुरवठा संस्थांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे पोलीस प्रशासनाने या प्रकरणाने गांभीर्याने लक्ष घालून चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली. सरकारकडून सध्या कृषी पंपासाठी सोलर प्रकल्पाला चालना दिली जाते, मात्र नदी काठावर सोलर प्रकल्प असू नयेत. नदी काठावर सोलर प्रकल्प उभारणे संयुक्तिक ठरणार नाही अशी भूमिका आंदोलनादरम्यान मांडण्यात आली. या आंदोलनामध्ये जिल्ह्यातील विविध भागातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होत प्रशासनाकडे न्याय मागितला.