शिक्षणाधिकारी गणपती कमळकर यांची कोल्हापुरात बदली
schedule08 Dec 25 person by visibility 947 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी गणपती कमळकर यांची कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय येथे सहायक शिक्षण संचालक म्हणून बदली झाली आहे. राज्य सरकारच्या शालेय शिक्षण वि क्रीडा विभागाने यासंबंधीचा आदेश काढला आहे. कमळकर यांनी यापूर्वी कागल येथे गटशिक्षणाधिकारी म्हणून काम केले आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने ठाणे महापालिकेतील प्रशासनाधिकारी कमलाकांत म्हेत्रे यांची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे येथे प्रशासनाधिकारी म्हणून बदली झाली आहे. शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव मो. बा. ताशिलदार यांनी सोमवारी, आठ डिसेंबर २०२५ रोजी बदलीचे आदेश काढले आहेत.