Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शिक्षक संघ थोरात गटाची गुरुवारी राळेगणसिद्धीत महामंडळ सभाजीएसटी प्रकरणांच्या सुनावणीसाठी पुण्यातील अधिकारी महिन्यातून एकदा कोल्हापुरात येणारमुख्यमंत्र्यांचा शक्तिपीठ महामार्गचा सिनेमा कोल्हापूरसह तेरा जिल्ह्यात फ्लॉप होणार - सतेज पाटील सरकारी कंत्राटदारांचे रविवारी कोल्हापुरात महाअधिवेशन ! थकित बिलाचा विषय ऐरणीवर, फेडरेशनची स्थापना होणार !!शक्तिपीठ  महामार्गाच्या विरोधात कोल्हापुरात शेतकऱ्यांचा एल्गार !  एकच निर्धार , शक्तिपीठ हद्दपार !!शाहू महाराज हायस्कूलमध्ये शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखेंची  जयंती साजरीहलाल प्रमाणपत्र रद्द करत नाहीत तोपर्यंत लढा चालू - रमेश शिंदेविद्यापीठ विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली कुलगुरुंची भेट रवळनाथ हौसिंग फायनान्सच्या, कोल्हापूर शाखेच्या वर्धापनदिनी रंगला आनंद सोहळानाथाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने घेतली प्रशासकीय मंडळची भेट

जाहिरात

 

रवळनाथ हौसिंग फायनान्सच्या, कोल्हापूर शाखेच्या वर्धापनदिनी रंगला आनंद सोहळा

schedule09 Jun 26 person by visibility 25 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : श्री रवळनाथ को ऑपरेटिव्ह हौसिंग फायनान्स, कोल्हापूर शाखेचा चौदावा वर्धापनदिन व शंभर कोटी रुपयांचा ठेवीचा टप्पा पूर्ण केल्याबद्दलचा आनंद सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. शिवाजी  विद्यापीठातील मानव्यशास्त्र सभागृह येथे सोमवारी, (आठ जून २०२६) सायंकाळी हा आनंद सोहळा रंगला.

 शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर.के. कामत हे प्रुख अतिथी होते. विद्यापीठाचे कुलसचिव व्ही. एन. शिंदे, माजी परीक्षा नियंत्रक डॉ. बी. एम. हिर्डेकर,  यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले अध्यक्षस्थानी होते. कुलगुरू डॉ. कामत यांनी, ‘सभासदांचा विश्वास, ग्राहकाभिमुख सेवा आणि आर्थिक शिस्त या त्रिसुत्रीची सांगड घालत श्री रवळनाथ को ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीने साधलेली प्रगती वाखाणण्याजोगी आहे’ असे मत व्यक्त केले.

या समारंभात शाखेचे पहिले चेअरमन प्राचार्य डॉ. एच. व्ही. देशपांडे, प्रा. आर. एस. पाटील, वीरशैव बँकेचे अध्यक्ष डॉ. सतीश घाळी, उमेश मिसाळ, अमृत सुतार, भास्कर सांगावकर, प्रा. रवींद्र पोर्लेकर, प्राचार्या डॉ. वर्षा मैंदर्गी, पंकज राजे, संस्थेचे कोल्हापूर शाखा चेअरमन विजय हरगुडे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे निवृत्त असिस्टंट जनरल मॅनेजर अविनाश जोशी यांचे ‘आजचे बँकिग आणि त्यातील जीवन’ या विषयावर व्याख्यान झाले. जोशी यांनी बँकिग क्षेत्रातील जोखीम व्यवस्थापन, कामकाजाची पद्धत, रिझर्व्ह बँकेची नियमावली, ग्राहकाभिमुख सेवा आणि विश्वासार्हता यासंबंधी मार्गदर्शन केले.

संस्थेचे चेअरमन प्राचार्य डॉ. आर. एस. निळपणकर, उपाध्यक्ष डॉ. संजय चौगुले, संचालक प्राचार्य डॉ. किरण पोतदार, दत्तात्रय पाटील, मनोहर पुजारी, महेश मजती, राजश्री कोले, सीईओ डी. के. मायदेव आदी उपस्थित होते. कोल्हापूर शाखा सल्लागार प्रा. डॉ. चंद्रकांत पोतदार यांनी सूत्रसंचालन केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes