बनायचे होते डॉक्टर, झाला सीए ! आसिम मेमन कोल्हापूर विभागात प्रथम !!
schedule04 Nov 25 person by visibility 155 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : दि इन्स्टिटयूट ऑफ चार्टर्ड अकौटंट ऑफ इंडियातर्फे सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या सीए अंतिम परीक्षेत कोल्हापूर विभागात आसिम मेमन हा प्रथम आला. ६०० पैकी ३९२ गुण मिळवले. दहावीत असताना डॉक्टर बनायचे त्याने निश्चित केले, मात्र रसायनशास्त्र विषय आवडत नसल्यामुळे वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला. कुटुंबीयांचे प्रोत्साहन, अभ्यासातील सातत्य या बळावर सीए परीक्षेत यश मिळवले.
मेमन कुटुंबीय हे सध्या शाहुपरीत वास्तव्यास आहे. ते मूळचे मालवण येथील आहेत. आसिम येथील छत्रपती शाहू विद्यालयात आठवी ते दहावीपर्यंत शिकला. कुटुंबीयांची ईच्छा होती की आसिमने डॉक्टर बनावे. मात्र रसायनशास्त्र विषय आवडत नव्हता. यामुळे विज्ञान शाखा निवडण्याऐवजी वाणिज्य शाखेच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. पुढे विवेकानंद कॉलेजमध्ये बारावी परीक्षेत ९१ टक्के गुण मिळवले. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर सीए परीक्षेची तयारी सुरू केली.