गायक शिक्षक मंचचा सोमवारी सातवा वर्धापनदिन, नाईन्टीज मेलडी संगीत मैफिल
schedule22 Nov 25 person by visibility 115 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : गायक शिक्षक मंचच्या सातव्या वर्धापनदिनानिमित्त सोमवरी, २४ नोव्हेंबर २०२५ रोजी गायन समाज देवल क्लब येथील गोविंदराव टेंबे रंगमंदिर येथे नाईन्टींज मेलडी संगीत मैफल आयोजित केले आहे. या कार्यक्रमात नव्वदीच्या दशकातील सदाबहार गीतांची नाईन्टीज मेलडी संगीत मैफिल आहे. सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन गायक शिक्षक मंचचे समन्यवक राजेंद्र कोरे व बाळ डेळेकर यांनी केले आहे.
शिक्षण क्षेत्रातील अधिकारी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या हक्काचं व्यासपीठ असलेल्या गायक शिक्षक मंचाचा सातवा वर्धापनदिन होत आहे. गेल्या सात वर्षापासून मिले सूर मेरा तुम्हारा, चित्रहार, आर. डी बर्मन स्पेशल, द म्युझिकल ट्रिब्यूट टू ऋषी कपूर अँड मोहम्मद अजीज, मंगल गाणी दंगल गाणी अशा एकापेक्षा एक मराठी हिंदी गीतांच्या संगीतमय मैफिलींचे सादरीकरण मंचाच्या अधिकारी व शिक्षक सदस्यांनी सादर केले आहे. वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात नव्वदीच्या दशकातील कुमार सानू, उदित्त नारायण, एसपी.बालसुब्रमण्यम, हरीहरन,सोनू निगम, महम्मद अजीज,सुरेश वाडकर,लता मंगेशकर, आशा भोसले, अलका याज्ञिक, अनुराधा पौडवाल, कविता कृष्णमुर्ती, साधना सरगम यांच्यासह विविध गायकांनी अजरामर केलेल्या गीताचे सादरीकरण करण्यात येणार असल्याचे संयोजकांनी म्हटले आहे.